Breaking News

अजून मसूद जिवंत


अमेरिकेचे नेव्ही सील कमांडोपथक पाकिस्तानातील अबोटाबादमध्ये घुसून अल कैदाचा म्होरक्या ओसामा बिन लादेनचा खात्मा करू शकते, तर भारतही हे करु शकतो. सध्याच्या परिस्थितीत सर्व काही शक्य आहे असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

'जैश'चा म्होरक्या मसूद अझहर अजून जिवंत आहे. त्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी केलेले हे विधान अत्यंत महत्वपूर्ण आहे. भारताच्या या कारवाईत 'जैश'चा म्होरक्या मसूद अझहरचे नातेवाईक आणि महत्वाचे दहशतवादी मारले गेल्याची शक्यता आहे.