Breaking News

टीव्ही ऐवजी संस्काराचे बटण दाबावे : साळूंके


कोपरगांव / प्रतिनिधी :- हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे मनाने, ज्ञानाने, शरीराने आणि बुद्धिनेही थोर युगपुरूष होते. हल्लीच्या तरूणाईने त्यांच्यातील गुण आत्मसात करून टीव्ही चे बटण दाबण्यांपेक्षा संस्काराचे बटण दाबून स्वत:ला घडवावे व समाजाची प्रगती साधावी असे आवाहन ज्येष्ठ शिवशाहीर संतोष साळूंके लातुरकर यांनी केले.

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्यावतींने छत्रपती शिव जयंती शहरातील मुख्य रस्त्यावरील अश्वारूढ शिवपुतळया समोर साजरी केली त्याप्रसंगी ते बोलत होते. पुलवामा जम्मु काश्मिर येथे भारतीय जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात 40 जवान शहीद झाले त्याबददल त्यांना श्रध्दांजली वाहण्यांत आली.प्रारंभी कोपरगांव तालुका औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी प्रास्तविकात संजीवनी युवा प्रतिष्ठानने तसेच माजीमंत्री शंकरराव कोल्हे व सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या मार्गदर्शनांखाली युवापिढीसाठी केलेल्या कार्याचा आढावा दिला. बालकलाकार पियूष लोखंडे, अक्षय ठोंबरे, सचिन शिल्लक यांनी शिवाजींची थोरवी सांगितली. लतिफ पठाण सर यांनी मैदानी खेळाचे प्रात्याक्षिक करून दाखविले. संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या विद्यार्थ्यांनी शीवगीत व नृत्य सादर केले.