Breaking News

सेतू मार्फत सर्वसामान्यांना तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न- पाटील


नेवासे/प्रतिनिधी: नेवासा शहरात मध्यवर्ती भागात सेतू कार्यालय सुरू करण्यात आले असून सर्वसामान्य नागरिकांना सेतू कार्यालयाच्या माध्यमातून तत्पर सेवा देण्याचा प्रयत्न झाला पाहिजे असे प्रतिपादन तहसीलदार सुधीर पाटील यांनी केले.शहरात तलाठी कार्यालयाजवळच माऊली कॉम्प्युटर  येथे सेतू कार्यालय सुरू करण्यात आले. या कार्यालयाचे उदघाटन तहसीलदार सुधीर पाटील यांनी केले. यावेळी ते बोलत होते.

यावेळी  माऊली डिजिटल सेवा सेतूचालकच्या संचालिका वंदना वाबळे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. माऊली डिजिटल सेतू केंद्राचे मार्गदर्शक प्रा. नितीन धस यांनी प्रास्ताविक केले.शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कामध्ये सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न सेतूचालकांनी सेवाभावी वृत्तीने करावा असे आवाहन तहसीलदार सुधीर पाटील यांनी यावेळी बोलताना केले.

या कार्यक्रमाप्रसंगी माजी नायब तहसीलदार विनायकराव धस,कामगार तलाठी बद्रीनाथ कमानदार , डॉ.करण घुले, सुनील मोरे,अशोक वाबळे,आशिष कावरे, दीपक परदेशी,संतोष भागवत, आदित्य चव्हाण आदी उपस्थित होते. सुधीर चव्हाण यांनी  सूत्रसंचालन केले तर प्राचार्य नितीन धस यांनी आभार मानले..