Breaking News

अल्पवयीन मुलींना पॉर्न फिल्म दाखवणारा तरुण गजाआड


नवी मुंबईः दोन अल्पवयीन मुलींना जबरदस्तीने अश्‍लील व्हिडिओ क्लिप दाखवण्याच्या आरोपाखाली एका 29 वर्षीय तरुणाला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे.विकेश चौहान असे आरोपीचे नाव असून तो तळोजा येथे एका खासगी कंपनीत काम करतो. विकेश याने या दोन अल्पवयीन मुलींना वेगवेगळ्या वेळेला आपल्या मोबाइल फोनमधील अश्‍लील व्हिडिओ क्लिप दाखवण्याचा प्रयत्न केला.

याबाबत उपलब्ध झालेल्या सीसीटीव्ही फूटेज आणि मोबाइल लोकेशनच्या पुराव्यांचा आधार घेत पोलिसांनी लोकेशला अटक केली.