Breaking News

नेहमी सत्याचाच विजय होत राहील : रॉबर्ट वढेरा

रॉबर्ट वढेरा साठी इमेज परिणाम

नवी दिल्ली - यूपीए अध्यक्ष सोनिया गांधींचे जावई रॉबर्ट वढेरा यांची सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) अवैध संपत्ती प्रकरणी चौकशी सुरू आहे. या प्रकरणात वढेरा यांनी फएसबुकवरती पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी ’नेहमी सत्याचाच विजय होत राहील’ असे म्हटले आहे.

’शुभ प्रभात, मी मला मदत करणार्‍या आणि मला पाठबळ देण्यासाठी देशभरातून आलेल्या माझ्या मित्रांचे आणि परिचितांचे आभार मानतो. या क्षणी, मी अगदी व्यवस्थित आहे. तसेच, कोणत्याही गोष्टीचा सामना करण्यासाठी तयार आहे. मला या सर्व गोष्टीतून जाणे भाग पडले. ’नेहमी सत्याचाच विजय होत राहील’. तुम्हा सर्वांचा रविवार आनंदात जावो. तसेच, आठवडा आरोग्य पूर्ण राहो, या सदिच्छा,’ असे वढेरा यांनी या फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे. वढेरा यांची या आठवड्यात तीन वेळा कसून चौकशी करण्यात आली. पहिली चौकशी बुधवारी 6 तास तर, तिसर्‍यांदा शनिवारी झालेली त्यांची चौकशी तब्बल 8 तास चालली. वढेरा यांनी त्यांच्या विरोधातील आरोप फेटाळून लावले आहेत. याच खटल्यामध्ये पतियाळा हाऊस कोर्टाने त्यांना 2 फेब्रुवारीला 16 फेब्रुवारीपर्यंतच्या काळासाठी जामीन मंजूर केला होता.