Breaking News

पाटण तालुक्यात पुणे पोलिसांची करडी नजर?पाटण  (प्रतिनिधी) : पुणे येथे घरफोडी करून घरफोडीतील चोरीचा दस्तऐवज पाटण तालुक्यात विकला असल्याच्या संशयावरून बुधवारी पुणे पोलीसानी तालुक्यातील नवारस्ता बाजारपेठेतील सराफी व्यापार्‍यांची झाडाझडती घेतली यामध्ये एका संशयित सराफा ला चौकशी साठी ताब्यात घेतल्याची चर्चा असल्याने तालुक्यातील व्यापारी व सराफी वर्गात खळबळ उडाली आहे. काही वर्षापासून पुणे परिसरात होणार्‍या घरफोड्या मध्ये पाटण तालुक्याचे कनेक्शन असल्याचे पुणे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने पुणे पोलिसांच्या पाटण तालुक्यात घिरट्या वाढल्याचे दिसत आहे.

बुधवारी सकाळपासूनच तालुक्यातील नवारस्ता परिसरात पुणे क्राईम ब्रँचची एक पोलीस गाडी ठाण मांडून असल्याचे दिसत होते, शिवाय या पोलीस गाडीमधील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून व्यापारी वर्गांची चौकशी करण्यात येत होती.यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता पुणे परिसरात घरफोडी झाल्या असून याचे कनेक्शन पाटण तालुक्यात असून या घरफोडीतील चोरीचा दस्तऐवज संशयित चोरट्यानी तालुक्यातील काही बाजारपेठामधील व्यापारी तसेच बड्या धेंड्याना विकला असल्याचे पोलीस तपासात पुढे आल्याने पुणे पोलिसांनी बुधवारी नवारस्ता येथील बाजारपेठेतील काही संशयित व्यापार्‍यांची चौकशी होत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान या चौकशीत एका संशयित सराफाला पुणे पोलिसांनी ताब्यात ही घेतले असल्याची चर्चा दिवसभर सुरु होती.
दरम्यान दोन वर्षापूर्वी ही अशाच प्रकारे पुणे येथील चतुःशृंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक घरफोड्या झाल्या होत्या या घरफोडीत सुमारे साडे 11 लाख रुपयांचे सोन्या चांदीचे दागिने सापडले होते त्याअनुषंगाने पुणे पोलिसांनी पाटण तालुक्यात वच ठेवला होता.आणि ऐन नवरात्रोत्सव काळात पुणे पोलिसांनी एक टीम तयार करून संबंधित संशयितिना ताब्यात घेवून चोरीचा माल हस्तगत करण्यात यश मिळवले होते.त्यावेळी ही पाटण तालुक्यातील पाटण,नवारस्ता,मल्हारपेठ येथील बाजारपेठेमधील अनेक सराफ व्यावसायिक,बार मालक,काँट्रॅकटर अशा अनेक बड्या व्यापार्यांनी चोरीचा ऐवज घेतले असल्याची पाटण तालुक्यात जोरदार चर्चा सुरु झाल्या होत्या. एकंदरीत पुणे घरफोडीच्या या पाटण तालुका कनेक्शन मुळे मात्र पाटण तालुक्यातील व्यापारी वर्गातून खळबळ उडाली आहे.