Breaking News

पाटण, कोरेगांव, वाई तालुक्यांमध्ये आरोग्य शिबिरेसातारा (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पाटण, कोरेगांव, वाई येथील नागरीकांच्या सोयीसाठी, केंद्र सरकार व राज्यसरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या विद्यमाने मोफत सर्व रोगनिदान व उपचार शिबिर तज्ञ वैद्यकिय पथकाव्दारे आयोजित करण्यात आले असून, या शिबिरामध्ये मल्टी सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल्स मध्ये कार्यरत असणारे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत, या शिबिरांचा पाटण, कोरेगांव,वाई तालुक्यातील नागरीकांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भेासले यांची केले आहे.

याबाबत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भेासले यांनी दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात नमुद केले आहे की, सातारा जिल्हा आरोग्यदायी जिल्हा रहावा यासाठी आमचे नेहमीच प्रयत्न राहीले आहे. जिल्हयाची संमिश्र भौगोलिक परिस्थिती, अतिपावसाचा पश्‍चिम भाग आणि पूर्वेकडील कोरडा भाग याचा विचार करता, सार्वजनिक आरोग्य सुविधा दर्जेदार मिळणेकरीता आमचे विशेष प्रयत्न राहीले आहेत. याकामी शासनाच्या आरोग्य विभागाचे तसेच सर्वसाधारण रुग्णालयाचे नेहमीच सहकार्य लाभले आहे. तरी सुध्दा जे रुग्ण काही कारणास्तव तज्ञ वैद्यकिय सुविधेपासून वंचित आहेत, किंवा इच्छा असुनही ज्यांना आरोग्याबाबत जरुर त्या तपासण्या करता येत नाहीत, अश्या व्यक्तींकरता, सातारा जिल्हयात महा आरोग्य मेळा 2019 चे आयोजन करण्यात आलेले आहे.

 या आरोग्य मेळयामध्ये पुणे,सातारा,कराड येथील प्रसिध्द आणि तज्ञ डॉक्टर्स सहभाग नोंदवणार असून, रुग्णांची आरोग्य तपासणी आणि रक्त तपासणी मोफत केली जाणार आहे. तसेच या शिबिरामध्ये स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, शल्यचिकित्सक, डोळयांचे तज्ञ डॉक्टर्स,कान,नाक,घसा, दंत आणि मुखराग चिकित्सक, तसेच कर्करोग तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याशिवाय व्यक्तीच्या आहार आणि विहार विषयी मार्गदर्शन, कुटूंबकल्याण नियोजन व त्याबाबतचे समुपदेशन, व्यंधत्व निवारण तपासणी व उपाययोजना, क्षयरोग, दमा रोगाविषयी तपासण्या,मोफत करण्यात येणार आहेतृ तसेच आवश्यकतेप्रमाणे ई.सी.जी.,एक्स-रे,सोनोग्राफी सुध्दा केली जाणार आहे असे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी स्पष्ट केले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्याविषयक उपयुक्त माहीती आणि समुपदेशनची व्यवस्था शिबिरात केली आहे. लोकांचे आरोग्य सुव्यवस्थित राहीले तर जीवनामध्ये सर्वकाही आहे या उद्येशाने हे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या महा आरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक 13 फेब्रूवारी 19 रोजी मिशन हॉस्पिटल वाई येथे सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत होणार आहे. या आरोग्य महाशिबिराचे समन्वय म्हणून डॉ. चंद्रशेखर घोरपडे हे काम पहात आहेत, या शिबिराबाबत काही अधिक माहीती आवश्यक असल्यास डॉ.चंद्रशेखर घोरपडे यांच्याशी (भ्रमणलहरी क्र.7709070707) संपर्क साधावा तसेच सर्वांनी या महाआरोग्य शिबिराचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहनही खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.