Breaking News

आत्महत्येप्रकरणी तिघांविरूध्द गुन्हा


औंध (प्रतिनिधी): चोराडे (ता.खटाव) येथील पंचेचाळीस वर्षीय विवाहितेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह दोन्ही मुलांवर औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी,चोराडे येथील विजय अवघडे याच्याशी औंध येथील मनिषा इंगळे यांचा विवाह झाला होता. मात्र पती विजय अवघडे हे विविध कारणांनी पत्नी मनिषा हिचा छळ करीत होते. वारंवार होणार्‍या त्रासाला कंटाळून शुक्रवारी मनिषा यांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली असल्याची फिर्याद मनिषा यांची आई श्रीमती अबई बाळू इंगळे यांनी औंध पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे.