वधेरा याच्या दोन दिवसांच्या चौकशीनंतरही ‘ईडी’असमाधानी


नवीदिल्लीः आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी रॉबर्ट वधेरा चौकशीसाठी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात आज पुन्हा दाखल झाले. यापूर्वी ‘ईडी’ने वधेरा यांची दोन दिवस चौकशी केली आहे; परंतु ‘ईडी’चे समाधान झालेले नाही.


या प्रकरणी बुधवारी ‘ईडी’ने वधेरा यांची 6 तासांहून अधिक काळ चौकशी केली. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी गुरुवारीही वधेरा सुमारे 9 तास ‘ईडी’च्या कार्यालयात होते. शुक्रवारी वधेरा हे पत्नी प्रियांका गांधींसोबत काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम यांच्या पुस्तक प्रकाशनच्या कार्यक्रमालाही उपस्थित राहिले. त्या ठिकाणी त्यांना ‘ईडी’ने केलेल्या चौकशीबाबत विचारण्यात आले; मात्र त्यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही.

वधेरा यांची लंडनमधील स्थावर मालमत्ता खरेदीबाबतची चौकशी अपूर्ण राहिल्याने त्यांना पुन्हा गुरुवारी चौकशीसाठी बोलावण्यात आले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तपासादरम्यान जप्त केले गेलेले दस्तावेज वधेरा यांना दाखवण्यात आले. यात फरार संरक्षण दलाल संजय भंडारी यांच्याशी संबंधित कागदपत्रांचाही समावेश आहे.


वधेरा यांची चौकशी करणार्‍या टीममध्ये ‘ईडी’चे संयुक्त संचालक, उप संचालक आणि इतर 5 अधिकार्‍यांचा समावेश आहे. शनिवारी दिल्लीच्या एका न्यायालयाने वधेरा यांना 16 फेब्रुवारीपासून ‘ईडी’च्या अटकेपासून संरक्षण दिले आहे. त्यांच्या अंतरिम जामिनासाठीच्या याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे आदेश दिले. वधेरा यांना चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश देताना न्यायालयाने 16फेब्रुवारीपर्यंत त्यांच्या चौकशीची परवानगी दिली आहे.

वधेरा यांनी मांडली बाजू

वधेरा हे सर्व प्रश्‍नांची उत्तरे देत ‘ईडी’ला योग्य ते सहकार्य करत असल्याचे त्यांच्या वकिलांनी बुधवारी म्हटले होते. काँग्रेस पक्ष देखील वधेरा यांच्या पाठिशी असल्याचे वकिलाने स्पष्ट केले आहे. ‘ईडी’च्या चौकशीदरम्यान प्रियांका गांधीही ‘ईडी’कार्यालयात पोहोचल्या होत्या. मी माझ्या पतीसोबत असल्याचे प्रियांका यांनीही म्हटले होते.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget