Breaking News

राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत राहुल थोरातला सुवर्णपदक


अहमदनगर/प्रतिनिधी : अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा खेळाडू राहुल थोरात याने शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल त्याचा शाळेच्या वतीने गौरव करण्यात आला. संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांनी खेळाडूचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. राहुल थोरात हा इयत्ता 9 वी मधील विद्यार्थी असून, त्याने बंगलोर (कर्नाटक) येथे झालेल्या शालेय राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या 14 वर्षाखालील मुलांच्या संघाकडून खेळताना सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

संस्थेचे सहकार्यवाह गौरव फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, सुनंदा भालेराव, मुख्याध्यापक उल्हास दुगड, पर्यवेक्षक राजेंद्र बेद्रे, सुनील खिस्ती, रवींद्र लोंढे आदींसह शिक्षकांनी त्याचे अभिनंदन केले आहे. राहुलला क्रीडा शिक्षक रावसाहेब बाबर, कैलास साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.