Breaking News

अवैध वाळू घेवून जाणारा हायवा महसूल अधिकार्‍यांनी पकडला


गेवराई : प्रतिनिधी

गोदावरी नदीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा करून बीडकडे निघालेला हायवा सोमवारी रात्री पाडळसिंगी टोलनाक्यावर महसूल विभागाच्या अधिकार्‍यांनी पकडला असून सदरील हायवा येथील तहसील कार्यालयासमोर उभा करण्यात आला आहे.

गेल्या अनेक महिन्यापासून गोदावरी नदीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा सुरू आहे महसूल विभागाने एक दररोज रात्री अवैध वाळू उपसा करणार्‍या वाहनावर नजर ठेवण्यासाठी नायब तहसिलदार प्रशांत जाधवर यांच्या मार्गदर्शनाखाली, मंडळाधिकारी,तलाठी यांचे पथक नेमले आहे मात्र तरीही तालुक्यातील गोदावरीच्या पात्रातुन अवैध वाळु माफियांच्या माध्यमातून सुरु आहे दरम्यान दि ११ सोमवारी रोजी एक हायवा गोदावरीच्या पात्रातुन अवैध वाळू उपसा करून बीडकडे जात असल्याची माहिती महसूल विभागाच्या कर्मचार्‍यांना समजली असता धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील पाडळसिंगी टोलनाक्यावर सदरील हायवा क्रमांक एम एच १२ पीक्यु ९३९७ पकडण्यात आला आहे हायवा चालकाने तेथेच वाळु खाली केली होती.ही कारवाई प्रभारी तहसीलदार अभय जोशी, मंडळाधिकारी अंगद काशीद, अमोल कुरूळकर, तलाठी, विकास ससाणे, गोविंद ढाकणे, सह आदिनी केली आहे दरम्यान या हायवा मध्ये चार ते पाच ब्रॉंस वाळु असुन जवळपास तिन लाख रुपयांची ही कारवाई केली आहे पंचनामा महसूल मंडळाधिकारी अंगद काशीद यांनी केला आहे दरम्यान उशीरापर्यंत दंड निश्चित झाला नव्हता सदरील हायवा येथील तहसील कार्यालयासमोर उभा करण्यात आला आहे.