Breaking News

युद्धाने कुठल्याही देशाचं भलं झालं नाही- इम्रान खान; भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव


पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी एक व्हिडीयो संदेश देत भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव मांडला. युद्धाने कुठल्याही देशाचं भलं झालं नाही. युद्धाचा शेवट हा विनाशच असतो असं सांगत त्यांनी पाकिस्तानने आज सकाळी केलेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचं समर्थन केलं.

इम्रान खान यांचा हा व्हिडीयो एडिट करून लावण्यात आला होता. पाकिस्तानला कुठल्या नागरी किंवा लष्करी तळावर हल्ला करायचा नव्हता तर फक्त आपली शक्ती दाखवायची होती असंही ते म्हणाले. भारताचे दोन पायलट आमच्या ताब्यात आहेत असा दावा इम्रान खान यांनी केला. पुलवामा हल्ल्यानंतर आम्ही पुरावे देण्याची मागणी केली होती. मात्र भारताने पुरावे दिले नाही, उलट पाकिस्तानच्या हद्दीत येवून हल्ले केले.

परिस्थिती अशीच चिघळत राहिली तर माझ्या आणि नरेंद्र मोदी यांच्या हातातही काही राहणार नाही असंही त्यांनी सांगितलं. आम्ही सर्व विषयावर चर्चा करण्यास तयार आहोत असं सांगत त्यांनी भारतापुढे चर्चेचा प्रस्ताव ठेवला.