Breaking News

राज योगामुळे जीवनाचा खरा अर्थ समजतो- राजश्री घुले


शेवगाव/प्रतिनिधी
राज योगामुळे जीवनाचा खरा अर्थ समजतो व जीवन आंनदी होते.असे प्रतिपादन अहमदनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षा राजश्री चंद्रशेखर घुले यांनी राष्ट्रीय आयुष्य अभियान महाराष्ट्र व ब्रह्मकुमारीज वैद्यकीय प्रभाग यांच्या संयुक्त विद्यमाच्यावतीने ओमशांती केंद्र शेवगाव येथे शेवगाव पंचायत समिती आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्स, अधिकारी यांच्यासाठी आयोजित मानसिक स्वास्थ्य व राज्य ध्यान कार्यक्रम प्रसंगी केले.

या प्रसंगी केंद्राच्या संचालक ब्रम्हकुमारी पुष्पा बहन, आरोग्य अधिकारी डॉ.हिराणी , सरपंच हरिभाऊ दुकळे उपस्थित होते. यावेळी बोलताना घुले यांनी सांगितले की, राज योगामुळे मनशांती प्राप्त होते व काम करण्याची शक्ती वाढते व त्यामधूनच जीवनाचा खरा अर्थ माणसाला समजतो. ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या माध्यमातून आयोजित ध्यानधारणा राजयोगाचा सर्वांनी लाभ घ्यावा. कारण धकाधकीच्या जीवनामध्ये डॉक्टर्स नर्सेस यांना अनेक वेळा ताणतणावाचा सामना करावा लागतो. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस याना मानसिक स्वास्थ्य व मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित राहण्यासाठी राजयोगाची आवश्यकता असल्याचे घुले यांनी सांगितले.
यावेळी केंद्राच्या दीपाबहन यांनी राजयोगासंबंधी मार्गदर्शन करताना सांगितले की, शरीर आणि आत्मा हे दोन भिन्न घटक आहेत. शरीरात जी चेतनशक्ती आहे. ती म्हणजे आत्मा, त्यामुळे शरीररूपी मंदिरात आत्मा असल्याने त्याचे महत्व आहे. यावेळी पुष्पादीदी बहन यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ.सोनाजी लांडे, डॉ.मनीषा लड्डा, डॉ.कैलास कानडे उपस्थित होते.