Breaking News

अमोल लोहार यास जीवन रक्षापदक पुरस्कारवाई प्रतिनिधी  : गुलमोहरकॉलनी बावधनंरोड ता.वाई येथे बुधवार दि 24 जानेवारी 2018 रोजी प्रतीक्षा सुनील महागडे रा .गुलमोहरकॉलनी हि येवती केनॉलमध्ये वाकळा धूत असताना तोल पाण्याच्या प्रवाहात सुमारे 300 फूट वाहत जळू होती . या मुलीचे प्राण अमोल सर्जेराव लोहार रा.सोनगिरीवाडी,वाई या युवकाने आपला जीव धोक्यात मोठ्या धाडसाने तिचे प्राण वाचविले यांनी केंद्र शासनाने दखल घेऊन या युवकाला उत्तम जीवन रक्षापदक पुरस्कार बुधवार दि .6 रोजी जाहीर झाला असून हा पुरस्कार राज्य शासनाच्या वतीने प्रदान करण्यात येणार आहे. दैनदिन जीवनात मानवाच्या सरक्षणासाठी उत्तम कामगिरी बाजवणार्‍या देशातील 48 व्यक्तींना जीवन रक्षापदक पुरस्कार जाहीर झाला आहे .यात महाराष्ट्रातील 5 जणांचा समावेश असून राष्ट्रपती रामनाथ कोविद याच्या परवानगीनंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने हा जीवन रक्षापदक पुरस्कार 2018 शुक्रवारी जाहीर करण्यात आला.

यात महाराष्ट्रातील सातारा जिल्हयातील वाई येथील अमोल लोहार याना उत्तम जीवन रक्षापदक पुरस्कार जाहीर झाला असून देशातील 48 नागरिकान ती श्रेणीत हे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तसेच यातील 8 व्यक्तींना मरणोत्तर सर्वातम जीवन रक्षापदक जाहीर झाले आहे . तर उत्तम जीवन रक्षापदक पुरस्कार 15 जणांना आणि जीवन रक्षापदक पुरस्कार 15 जणांना जाहीर झाला आहेत. हा पुरस्कार अमोल लोहार याना वाई खंडाळा - महाबळेश्‍वेरचे- जननायक आमदार मकरंद पाटील , वाई नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष - अनिल सावंत भाजप जिल्हाध्यश -विक्रम पावसकर उपाध्यक्ष -काशिनाथ शेलार वाई तालुका पत्रकार- संघाचे संस्थापक व मार्गदशक- शिवाजीराव जगताप अध्यक्ष - दौलतराव पिसाळ उपाध्यक्ष - अनिल काटे , विनोद पोळ , कार्यअध्यक्ष -तानाजी कचरे सचिव - संजीव वरे आदिसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले मुलीचे प्राण अमोल लोहार या युवकाने आपला जीव धोक्यात घालून मोठ्या धाडसाने तिचे प्राण वाचवल्याने त्यासाजे सर्वत्र कौतुक होत आहे.