Breaking News

सैनिकातील कुटुंबासाठी नवीन रुग्णालय होणार मस्केबीड (प्रतिनिधी)- बीडच्या पालवन व तळेगाव परिसरामध्ये सैनिक, माजी सैनिकांसाठी सैनिकांच्या पत्नीचे घराचे स्वप्न पूर्ण होण्या करिता शिवकृपा डेव्हलपर्सचे प्रो.प्रा. गणेश मस्के यांनी पुढाकार घेऊन अत्यंत सुलभ दरामध्ये या सैनिकांना प्लॉट मिळून त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी निसर्गरम्य वातावरणामध्ये सैनिकी नगर याची स्थापना केली आहे. देशाच्या संरक्षणासाठी अहोरात्र भारत मातेचे रक्षण करणारे सैनिक हे खरे शूरवीर आहेत, यांनी देशभक्तीचा व देश संरक्षणाचा खर्‍या अर्थाने वसा घेतलेला आहे, देशाची संरक्षणाची सेवा करत असताना आपले गाव, आपले राज्य,आपले कुटुंब हे सर्व सोडून फक्त देश सेवा करणार्‍या या सैनिकालाही वाटतं की आपल्या कुटुंबातील परिवारासाठी एक सुसज्ज असे घर असावे अशी भावना प्रत्येकाची असते.सहाजिकच या सर्व गोष्टी कडे माझा सैनिक दुर्लक्ष करतो, परंतु सैन्यातून सेवानिवृत्त झाल्यानंतर आपल्या कुटुंबाला वेळ देण्याची वेळ आल्यानंतर त्याची उमेद कमी झालेली असते आणि मार्केट मधील जमिनीचे व प्लॉटचे दर पाहून त्याचे घराचे स्वप्न भंग होते, अशा सैनिक ,माजी सैनिक, व वीरपत्नी यांच्यासाठी गणेश मस्के यांनी काम करायच ठरवले आहे. या सैनिकी नगरमध्ये बीड जिल्ह्यातील सैनिकांसाठी वैद्यकीय सेवा मोफत मिळावी, यासाठी सुसज्ज असा दवाखाना होवा यासाठी अत्यंत अल्पदरामध्ये नवीन दवाखान्याला जागा देण्याचे धाडस गणेश मस्के व शिव कृपा डेव्हलपर्सने केले, तसा प्रस्ताव केंद्रीय सैनिकी दलातील प्रशासनाला पाठवला आहे, त्याकरिता सैनिक व माजी सैनिकांचा पाठपुरावा सुरू असून, लवकरच सैनिकी नगर मध्ये नवीन रुग्णालय होणार असल्याचे मत राजेंद्र मस्के यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी उपस्थित उद्योगपती दिनेश मुंदडा, पारस ललवाणी ,श्री.कासट साहेब, संजय देवडकर, कमलाताई निंबाळकर बद्रीनाथ जटाळ, विनोद इंगोले,माजी सैनिक राख, माजी सैनिक शिंदे, बंडू मस्के, बंडु कोलंगडे, झोडगे सर यांच्यासह शेकडो माजी सैनिक उपस्थित होते.