Breaking News

भानसहिवरा येथे सौर ऊर्जा प्रकल्प व नळ पाणीपुरवठा योजनेस प्रारंभ; पाण्याचा वापर काटकसरीने करणे सर्वांची जबाबदारी - डॉ. कार्कविल


नेवासा फाटा/प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील खळवाडी प्रभागात सौर ऊर्जा प्रकल्प-नळ पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ जर्मनी येथील डॉ. श्रीमती पेत्रा कार्कविल यांच्या हस्ते करण्यात आला. जर्मनी येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. पेत्रा कार्कविल यांच्या पुढाकाराने हा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला असून यासाठी भानसहिवरा ग्रामपंचायतच्या सरपंच मीनाताई जोजार व पंचायत समितीचे सदस्य किशोर जोजार यांनी दिलेले योगदान ही महत्वपूर्ण ठरले आहे.

यावेळी डॉ. पेत्रा कार्कविल यांनी असे प्रतिपादन केले की, पाणी हे जीवन आहे पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे प्रतिपादन सौरऊर्जा प्रोजेक्ट देणार्‍या जर्मनीच्या सामाजिक कार्यकर्त्या व मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराच्या प्रचारक डॉ. पेत्रा कार्कविल यांनी यावेळी बोलताना केले. भानसहिवरा येथील खळवाडी प्रभागातील विहीरीवरून निम्म्या गावाला पाणीपुरवठा केला जातो मात्र विजेच्या लपंडावामुळे पाणी पुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतला अडथळे निर्माण होत होते. याची दखल नेवासा येथील ज्ञानमाऊली चर्चचे धर्मगुरू फादर प्रकाश राऊत यांनी घेतली व येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारावा म्हणून जर्मनी येथील डॉ.पेत्रा कार्कविल यांना विनंती केल्यानंतर येथे सुमारे आठ लाख रुपये खर्चाचा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. या सौरऊर्जा प्रकल्पामुळे आता विजेवर अवलंबून न राहता भानसहिवरा येथील निम्म्या गावाला पाणीपुरवठा सुरळीत होणार आहे. यावेळी भानसहिवरा ग्रामपंचायत व सेंट मेरीज कॅथॉलिक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या सौरऊर्जा प्रकल्प नळ पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी फादर प्रकाश राऊत हे अध्यक्षस्थानी होते, तर पंचायत समिती सदस्य व भानसहिवरा गावचे मार्गदर्शक किशोर जोजार, सरपंच मिनाताई जोजार, उपसरपंच भारती वंजारे, रेव्हरंट अनिल वंजारे, बाजार समितीचे संचालक प्रवीण वंजारे, संचालक बाळासाहेब भणगे, किशोर भणगे, मार्कस बोर्डे, मिखायल पातारे, आशिष वंजारे, आदी उपस्थित होते. तसेच यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष मधुकर कोल्हे, उपाध्यक्ष आंद्रेस वंजारे, सचिव पावलस वंजारे, प्रभुधर पाटोळे, मेजर जालिंदर गोरे, मेजो वंजारे, प्रेमचंद वंजारे, चंद्रकांत वंजारे, विकास वंजारे, मिखायल पातारे, लक्ष्मण मकासरे, संजय तुपे, जयराज काळे, संजय तुपे यांच्या अथक प्रयत्नातून सौर ऊर्जा प्रकल्प पूर्णत्वास आल्याने यावेळी पंचायत समितीचे सदस्य किशोर जोजार, मीनाताई जोजार, भारती वंजारे यांच्या हस्ते सर्वांचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास वंजारे यांनी केले तर प्रवीण वंजारे यांनी उपस्थितांचे आभार मानले.