Breaking News

कलावंतांचे काम अभ्यासक नजरेने पहावे- तांबे

अहमदनगर/प्रतिनिधी : “चित्रकला, शिल्पकला या दृश्यकला आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांनी विविध कलावंतांचे काम अभ्यासक नजरेने बघायला हवे यातूनच तुमची त्या त्या कलेची समज वाढीस लागेल, नजर तयार होईल व तुम्हाला तुमची अशी शैली सापडेल’’, असे उद्गार धुळे स्कुल ऑफ आर्टचे प्राचार्य व अनुदानित कला महाविद्यालय फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. सुनील तांबे यांनी काढले.

तारकपूर येथील प्रगत कला महाविद्यालयातर्फे प्रा.सुनील तांबे यांच्या ‘स्टील लाईफ’ या विषयावरील प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महापालिकेचे उपायुक्त प्रदीप पठारे यांच्यासह प्र. प्राचार्य नुरील भोसले, अधिव्याख्याता प्रा. संजय काळे, प्रा. एम. एम. सोनटक्के, पत्रकार संजय जोशी आदी उपस्थित होते.

प्रारंभी प्र. प्राचार्य भोसले यांनी, “या स्टील लाईफ विषयाकडे तुलनेने दुर्लक्ष होत असून ते टाळून या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी प्रगत कला महाविद्यालयामार्फत दरवर्षी स्टील लाईफ ड्रॉईंग कॉम्पिटीशन घेण्यात येते’’, अशी माहिती दिली. यावेळी पठारे यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार प्रा. सोनटक्के यांनी मानले.