म्हसवेत गावठी बॉम्बच्या स्फोट; मजूर गंभीर


कुडाळ(प्रतिनिधी) : जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील जंगलात बंधार्‍याचे काम करत असताना आज सकाळी दहाच्या सुमारास अचानक गावठी बॉम्बचा स्फोट झाला. त्यात एक मजूर गंभीर जखमी झाला. दादासो शामराव चव्हाण असे जखमी मजुराचे नाव असून त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या स्फोटात मजूर चव्हाण यांच्या डाव्या हाताच्या अक्षरश: चिंध्या झाल्या आहेत. तसेच तोंडावरही गावठी बॉम्बमधून उडालेल्या लोखंडी तुकड्यांमुळे तोंडाला आणि डोक्यालाही मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या होत्या. जखमी अवस्थेत असणार्‍या जखमीस डोंगरपायथ्याला असणार्‍या बंधार्‍यापासून एक किलोमीटर अंतरावरील रूग्णालयात खांद्यावरून आणून रुग्णालयात दाखल केले.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, वडाचे म्हसवे येथील जंगलात वैराटगडाच्या पायथ्याशी बंधार्‍याचे काम सुरू होते. सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास सर्व मजूर बंधार्‍यावर काम करत असताना अचानक दगड उचलताना दगडाखाली गावठी बॉम्बचा स्फोट झाला. त्यामुळे झालेल्या मोठ्या स्फोटामध्ये चव्हाण गंभीर जखमी झाले व बाजूला जमिनीवर कोसळले. ग्रामीण रूग्णालयातील उपचारानंतर जखमी झालेल्या मजुराला पुण्यात ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावठी बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी काही तासातच. बॉम्ब शोधक पथक दाखल झाले. पोलिसांनी कसून तपासणी केली. मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या माहितीनुसार तपासणीनंतरच ही जागा सुरक्षित असल्याचा खुलासा करण्यात येईल. असे सांगण्यात आले दरम्यान घटनास्थळी वनमजुरांच्या हाताची तुटलेली बोटे आढळून आली आहेत. या घटनेची नोंद कुडाळ पोलिस स्थानकामध्ये झाली असून सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने अधिक तपास करीत आहेत.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget