Breaking News

देशी गाय म्हणजे आरोग्य हमी - प्रतीक भिडे


अहमदनगर /प्रतिनिधी :  “गायीचे दूध, तूप, दही, ताक, लोणी, गोमूत्र, गोरस यापासून तयार होणार्‍या पंचगव्य वस्तू व वनौषधीपासून निर्मित अर्क यांचा आपल्या शरीराला खूप फायदा असल्याचे सांगून गोमातेला कत्तलखान्यात न पाठवता आपण त्याचे जतन केले तर त्यापासून आपल्याला फायदाच होणार आहे’’, असे वेदमूर्ती प्रतीक भिडे यांनी सांगितले. येथील मोरया गोसंवर्धन, सांगली यांच्या वतीने शहरामध्ये प्रथमच शमी गणपती मंदिर हॉलमध्ये पंचगव्य आरोग्य सेवा शिबीर घेण्यात आले. वेदमूर्ती प्रतीक भिडे यांनी नाडी परीक्षणाद्वारे शिबीरार्थींना तपासले.जनतेला   पंचगव्याविषयी माहिती पटवून दिली. गोमातेचे शारीरिक आणि भौगोलिक महत्व शिबिरार्थींना समजावून घेतले. शिबिरास राहुल माळी, युवराज पडोळे, गणेश म्याना, चेतन सादुल, विशाल थोरात, महेश गुडा, संदीप शिर्के यांचे सहकार्य लाभले.