Breaking News

आजच्या महाआरोग्य शिबीराचा पाटणसासियांनी लाभ घ्यावा: खा. उदयनराजे भोसले


सातारा (प्रतिनिधी) : केंद्र सरकार-राज्यसरकार यांच्या संयुक्त उपक्रमातून आणि आमच्या पुढाकाराने, बुधवार दि. 13 फेब्रुवारी रोजी ग्रामिण रुग्णालय, पाटण येथे सकाळी 10.00 वाजल्यापासून दुपारी 4.00 वाजेपर्यंत आयोजित केलेल्या महा आरोग्य मेळाव्यास पाटणवासियांनी आवर्जुन उपस्थित राहावे. आपल्या आरोग्याच्या समस्यांविषयी उपचाराविषयी (सुपर स्पेशालिटी) तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन घ्यावे, असे आवाहन सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले.

पाटण तालुका तसा दुर्गम आणि डोंगराळ म्हणून प्रसिध्द आहे. येथील माणूस अत्यंत कष्टकरी आणि प्रामाणिक आहे, त्याच्या व्यक्तीगत आरोग्याविषयी तो नेहमीच हेंडसाळ करतो. त्यामुळे आमच्या पुढाकाराने, ग्रामिण रुग्णालय, पाटण येथे सर्वरोग निदान आणि उपचाराचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. या महामेळाव्याचे समन्वयक म्हणून डॉ.चंद्रशेखर घोरपडे हे काम पहात आहे, छोट्या मोठया आजारापासून ते मोठया आजारापर्यंतचे निदान याठिकाणी तज्ञ वैद्यकीय अधिकारी करणार आहेत. ईसीजी, एसक्स-रे, सारखे उपचार तसेच डोळयांच्या विकाराविषयी नेत्र तपासणी आणि मोफत चष्मा वाटप केले जाणार आहे. तालुक्याच्या मुख्यालयाचे ठिकाणी म्हणजेच ग्रामीण रुग्णालय, पाटण येथे होणार्‍या महा आरोग्य मेळाव्यास सर्व पाटण वासियांनी वैयक्तीक आरोग्याविषयक मार्गदर्शन आणि उपचार घ्यावेत, असे आवाहन खा. उदयनराजे भोसले यांनी केले आहे.