Breaking News

साईबाबा महाविद्यालयात संत गाडगेबाबांना अभिवादन


शिर्डी / प्रतिनिधी: श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयात संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल,उपजिल्हाधिकारी मनोज घोडे पाटील,बाबासाहेब घोरपडे,दिलीप उगले यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले.प्राचार्य विकास शिवगजे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास अधिक्षक राजेंद्र कोते,प्रा.अमोल कचरे ,प्रा शिवाजी ढोकणे,डॉ आशिष धोकटे,डॉ सुनिता वडीतके,प्रा.सोनाली हरदास,प्रा. किशोर शेळके,प्रा.प्रणाली पवार,डॉ गणेश भांड,प्रा दिपाली उपासनी, प्रा प्रशांत गडकरी,प्रा.शितल धरम,प्रा.दिपक पटारे,प्रा वंदना देशमुख, प्रा कांचन चौधरी, प्रा मंदाकिनी सावंत,प्रा स्वाती कडू,प्रा सरीता लावरे, ग्रंथपाल भाऊसाहेब शिंदे,दिनेश कानडे,मनोज बकरे,प्रशांत शेळके, रामनाथ कासार,सुदाम कालेकर आणि महाविद्यालयीन कर्मचारी-विद्यार्थी उपस्थित होते. 

यावेळी बोलतांना प्राचार्य शिवगजे म्हणाले की,गाडगे बाबा म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्यातील एक कीर्तनकार, संत आणि समाजसुधारक होते. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम, व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दीन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.  ते सामाजिक न्याय देण्यासाठी विविध गावांना भटकत असत. गाडगे महाराजांची सामाजिक न्याय आणि सुधारणा आणि स्वच्छता या विषयांत जास्त रुची होती.

डॉ योगिता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले.प्रा स्वप्नाली खांडरे सूत्रसंचालन करून आभार व्यक्त केले.