पाच कोटी घटांवर भाजपचा झेंडा! निवडणुकीआधी भाजपचा मोठा संकल्प; घोषणेतून मोदींना वगळले


अहमदाबादः लोकसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यास अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आता निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. देशातील सत्ताधारी भाजपनेही पक्षाच्या प्रचारासाठी सर्व मार्ग अवलंबण्याचे ठरविले आहे. त्यासाठीच आता देशातील पाच कोटी नागरिकांच्या घरांवर पक्षाचा झेंडा फडकविण्याचा निर्धार पक्षाने केला आहे.

भाजपच्या महिनाभर चालणार्‍या विशेष प्रचार मोहिमेचा प्रारंभ मंगळवारी अहमदाबादमध्ये झाला. या वेळी पहिल्यांदाच ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या घोषणेचा वापरही सुरू करण्यात आला. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा आशयाची घोषणा तयार केली होती; पण या वेळी निवडणुकीसाठी पक्षाच्या घोषणेतून मोदी यांच्या नावाला वगळण्यात आल्याने अनेकांनी आश्‍चर्य व्यक्त केले आहे. या वेळी ‘मेरा परिवार, भाजप परिवार’ या घोषणेने निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी अहमदाबादमध्ये त्यांच्या घरावर पक्षाचा झेंडा फडकावून आणि पक्षाचे स्टिकर दाराला लावून या विशेष प्रचार मोहिमेची सुरुवात केली. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी शाह यांनी पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रेक्षागृहात उपस्थितांशी संवादही साधला.

प्रत्येक कार्यकर्त्याने आपल्या घरावर पक्षाचा झेडा लावावा. त्यासोबत आपला सेल्फी काढावा आणि तो ‘सोशल मीडिया’वर शेअर करावा, अशी सूचना या वेळी शाह यांनी देशातील कार्यकर्त्यांना केली. पाच कोटी घरांवर पक्षाचा झेंडा फडकाविण्याचा संकल्प पक्षाने सोडला आहे. त्यासाठी प्रत्येकाने झेंडा लावावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. ‘सोशल मीडिया’मध्ये हा फोटो शेअर करताना ‘मेरा परिवार भाजप परिवार’ या हॅशटॅगचा वापर करावा, असेही शाह यांनी म्हटले आहे. येत्या 2 मार्चपर्यंत देशात चार टप्प्यांमध्ये ही मोहीम होणार आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्या अगोदरच देशातील पाच कोटी कार्यकर्त्यांच्या घरावर भाजपचा झेंडा फडकावून वातावरणनिर्मिती करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget