Breaking News

प्रा. सुद्रिक यांना मराठा छावा पुरस्कारकर्जत /प्रतिनिधी
कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील प्रा. तात्यासाहेब सुद्रिक यांना सकल मराठा समाज औरंगाबाद यांच्या वतीने मराठा छावा पुरस्कार प्रदान करण्यात आला.आ.नितेश राणे व आ.हर्षवर्धन जाधव यांच्या हस्ते औरंगाबाद येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

कोपर्डीचे माजी सरपंच सतीश सुद्रिक व प्रा. तात्यासाहेब सुद्रिक यांनी हा पुरस्कार स्वीकारला.कोपर्डी प्रकरणानंतर महाराष्ट्रात सकल मराठा समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणावर निदर्शने,मूक मोर्चे काढण्यात आले.त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला. या अनेक टप्प्यांमध्ये कोपर्डी केंद्रस्थानी होते. सकल मराठा समाजाच्या संघटनासाठी कोपर्डी येथील प्रा.तात्यासाहेब सुद्रिक यांनी मोठे योगदान दिले.आपल्या परखड भाषेतून त्यांनी मराठा समाजाची भूमिका वेळोवेळी शासनकर्त्यांसमोर मांडली.त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना मराठा छावा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.