Breaking News

सातार्‍यात शिवजयंतीला भांडी वाटप उपक्रमसातारा, (प्रतिनिधी) : शिवजयंती उत्सवानिमित्त दि.19 फेब्रुवारी रोजी सातार्‍यात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले असून सातार्‍यातील जनसेवा प्रतिष्टान, गुरुप्रसाद मसाले व त्रिमूर्ती इंटरप्राइजेस यांच्या संयुक्त विद्यमाने जवान हौसिंग सोसायटी सदरबझार, सातारा येथे दि.19 रोजी सायंकाळी सहा वाजता होतकरू व गरजू व्यक्तींना युवा नेते शरद गायकवाड व बंधुत्व प्रतिष्टानचे संस्थापक अनिल वीर यांच्या हस्ते भांडी वाटपाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
त्यावेळी कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य प्रवर्तक आकाश बिचुकले- पवार यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी अक्षय पवार, देवेश नलावडे, ओम कांबळे, प्रथमेश पवार ,किरण जगदाळे आदी युवक व संयोजन समितीचे सदस्य परिश्रम घेत आहेत.