Breaking News

कला केद्र बंद व्हावेत या मागणीसाठी मोहा ग्रामस्थांचा उपोषणाचा तिसरा दिवसजामखेड प्रतिनीधी समीर शेख:  जामखेड तालुक्यातील मोहा गावच्या ग्रामस्थांचा कला केंद्र बंद व्हावेत यासाठी चालु असलेल्या आमरण उपोषणाचा आज तिसरा दिवस असुन. आज पासुन सर्व शाळा हायस्कुल कॉलेज बंद ठेवुन विद्यार्थी महिला यांनी ग्राम फेरी काढुन उपोषणास पांठीबा देऊन आकोश सभेतुन कलाकेंद्रास तीव्र विरोध केला आहे
जामखेड तालुक्यातील मोहा गावाजवळ 6 कलाकेंद्र आहेत. मात्र या कलाकेंद्रामुळे गावातील महिलांना शालेय मुलींना त्रास होत असल्याने ग्रामस्थांनी हे कालाकेंद्र बंद करण्याची मागणी केली. तसा ठरावही ग्रामपंचायत मध्ये केला. मात्र तरीही शासनाने या कालाकेंद्रांना परवानगी दिली. त्यामुळे हताश झालेल्या ग्रामस्थांनी दि 23 फ्रेबुवारी पासुन आमरण उपोषणाचा पवित्रा घेतलाय. गावातील ग्रामस्थांनी आणि महिलांनी आमरण उपोषण सुरू केले असून या उपोषणाचा आज तिसरा दिवस असुन आज सकाळी 9 वाजता गावातुन विद्यार्थी महिला मुली व ग्रामस्थांच्या वतीने गावातुन घोषणा देत ग्राम फेरी काढण्यात आली असून नंतर सभा घेण्यात आली या सभेतुन महिला मुली व ग्रामस्थाच्या वतीने शासन निर्णयाचा निषेध करुन कला केंद्र त्वरीत बंद करण्याची संतापजनक मागणी करण्यात आली आज पासुन सर्व शाळा हायस्कुल व महाविद्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला जर प्रशासनाने या कालाकेंद्रांवर कारवाई नाही केली तर येत्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा ही ग्रामस्थांनी दिला आहे

कला केंद्रचालक प्रतीनिधी गुलशन अंधारे यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले कि आम्ही
नियमांचे पालन करत असुन शासनाने दिलेल्या नियम व अटीस अधिन राहुन आपन कला केंद्र चालवत आहोत व जर ती कला केंद्र बंद पडली तर हजारो लोक कलावंताच्या उपासमारीचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे ग्रामस्थानी आम्हास सहकार्य करावे असे मत व्यक्त केले