डंपरच्या धडकेत महिला जखमी


कराड (प्रतिनिधी)  कराड- तासगाव रोडवर गोळेश्र्वर गावच्या हद्दीत एका भरधाव डंपरने पादचारी महिलेला धडक देऊन जखमी केल्याची दूर्घटना शनिवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत आस्लम आप्पासाहेब मकानदार यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली असून याप्रकरणी डंपरचालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अलका रामचंद्र जाधव (रा. आसद, ता. कडेगाव, जि. सांगली) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. तर बिजू बबन सोनवणे (रा. वहागाव ता. कराड) असे गुन्हा नोंद झालेल्या डंपर चालकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड- तासगाव रोडवर गोळेश्र्वर गावच्या हद्दीत शनिवारी सकाळी विजया लक्ष्मी नर्सरीसमोर डंपरचालक बिजु सोनवणे हा त्याच्या ताब्यातील एम. एच. 50 एन. 2800 हा हयगयीने, निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवत होता. त्यावेळी पादचारी महिला अलका जाधव ह्यांना डंपरची जोरदार धडक बसून अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत डंपरचालकावर कराड शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget