Breaking News

वडनेर हवेली येथे घरफोडी, सात तोळे सोने केले लंपासपारनेर/प्रतिनिधी
पारनेर तालुक्यातील वडनेर हवेली येथे रविवार दि.10 रोजी पहाटे तीनच्या सुमारास सुरेश शिवराम भालेकर यांच्या राहत्या घरी चोरी झाली. चोरांनी पेट्याचे गूलूप तोडून सात तोळे सोन्याचे दागिने व 2 हजार 800 रुपये रोख असा एकुण दोन लाख वीस हजाराचा ऐवज चोरून नेला.
रविवारी पहाटेच्या सुमारास सुरेश भालेकर यांच्या घरातील सर्व जण गाढ झोपले असताना चोरांनी घराच्या गेटची कडी उघडून आत प्रवेश केला. घरातील दरवाज्याची कडी काढून घरात प्रवेश केला. व घरातील पसार्‍याची उचकापाचक करून घरातून 3 पेट्या काही अंतरावर नेऊन त्याची उचकापाचक केली. त्यातील असणारे सात तोळे सोन्याचे दागिने रोख रक्कम चोरून पसार झाले. सुरेश भालेकर हे सकाळी सहा वाजता घराशेजारील बोरवेल चालू करण्यासाठी उठले असता त्यांना त्या ठिकाणी घरातील पेटी दिसली. त्यानंतर त्यांनी घरात येऊन पाहणी केली असता घरातील इतर पेट्या दिसल्या नाहीत.त्याचा शोधाशोध केला असता घरापासून काही अंतरावर पेट्या अस्ताव्यस्त अवस्थेमध्ये पडलेल्या दिसल्या. त्यातील सर्व कपडे बाहेर फेकून देऊन उचकापाचक करून दागिने घेऊन पसार झाले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर सचिन सुरेश भालेकर यांनी सुपा पोलिस स्टेशनला फोन करून माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व पाहणी करून अहमदनगर येथून डॉगस् पाचारण करण्यात आले. डॉग कॉडने पाचशे मीटर पर्यंत शोध घेतला. परंतु यापुढे हे गाड्यावरून पसार झाल्यामुळे ते पुढे जाऊ शकले नाही.
पुढील तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक संजय कुमार, ससोने हवालदार, बी.बी.अकोलकर, सुरेश धामणे, यशवंत ठोंबरे, सुरेश मुसळे करत आहेत.