गर्भपात प्रकरणी डॉक्टरांना तीन वर्षांची सक्त मजुरी


बीड/प्रतिनिधी: सात वर्षांपूर्वीच्या अर्भक मृत्यू प्रकरणात गर्भपात प्रतिबंधक कायद्याचा भंग केल्या प्रकरणी आरोपी डॉ. शिवाजी सानप यास न्यायालयाने तीन वर्षांची सक्त मजुरीची शिक्षा सुनावली.   जिल्हा न्या. ए. एस. गांधी यांनी हा निकाल दिला.

बीड शहरातील बिंदुसरा नदीच्या पात्रात 2011 मध्ये काही अर्भके मृत अवस्थेत आढळली होती. गर्भात स्त्री लिंगी अर्भक असेल तर गर्भपात करण्यासाठी काही दवाखाने प्रसिद्ध होते. डॉ सुदाम मुंडे आणि सरस्वती मुंडे यांच्या रुग्णालयातील असे प्रकार उघडकीस आल्यानंतर काही अर्भके बिंदुसरा नदीच्या पात्रात आढळली. या प्रकरणाचा तपास करावा अशी मागणी सामाजिक संघटनांकडून करण्यात आली. पोलीस यंत्रणेने तपास केला असता डॉ शिवाजी सानप यांच्या रुग्णालयातून गर्भपात झालेली अर्भक नदीपात्रात आल्याच समोर आले होते. या प्रकरणी

डॉ शिवाजी सानप यांच्यासह रुग्णालयातील इतर कर्मचारी आणि सहकारी डॉक्टरांवर गर्भलिंग प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायाधीशांनी सरकारी पक्षाचे 16 साक्षीदार तपासले. न्यायालयाने सानप याला दोषी ठरवत इतर आरोपींना निर्दोष ठरवले. गर्भपात प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 खाली तीन वर्षांची सक्त मजूरिची शिक्षा सुनावली.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget