सण-उत्सवांमुळे परंपरा अखंडीत राहते-राठोड


अहमदनगर/प्रतिनिधी : “भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ असून तिचे रक्षण करुन संवर्धन करण्याची गरज आहे, सण-उत्सवाने एकीचा संदेश दिला आहे, हा एकोपा व आपली वैभवशाली परंपरा कायम अखंडीत रहावी; यासाठी सण-उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे झाले पाहिजे, पटवर्धन चौक प्रतिष्ठानाने नेहमीच विविध लोकोपयोगी उपक्रमांना प्राधान्य दिले आहे, गणेशोत्सव, विविध राष्ट्रपुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीनिमित्त सण उत्सवात अन्नदानसारखे उपक्रम राबवून चांगला संंदेश देत आहेत, प्रतिष्ठानच्या उपक्रमातून पारंपरिक व सांस्कृतिक परंपरा जपण्याचे कार्य होत आहे’’, असे प्रतिपादन शिवसेना उपनेते अनिल राठोड यांनी केले.

पटवर्धन चौक प्रतिष्ठानच्यावतीने आनंदी बाजार चौकातील वरद विनायक गणेश मंदिरात श्रीगणेश जयंती उत्सव भक्तीपूर्ण वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुसर्‍या दिवशी आयोजित भंडार्‍यात भाविकांना शिवसेना उपनेते अनिल राठोड, ज्येष्ठ नेते वसंत लोढा यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप करण्यात आले. याप्रसंगी नगरसेविका सुवर्णा गेनप्पा, गणेश कवडे, सुभाष लोंढे, बंडोपंत क्षीरसागर, एल.जी. गायकवाड, अध्यक्ष संतोष गायकवाड, संजय वल्लाकट्टी, राजेंद्र औटी, शशिकांत देशमुख, संतोष गेनप्पा, सागर चवंडके, राम नळकांडे, मुकुंद वाळके, सुहास पाथरकर, बाळासाहेब फुटाणे, प्रमोद अष्टेकर, महादू हरबा आदिंसह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

गणेश जयंतीनिमित्त महाआरती करण्यात आली. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद वाळके, मनोज गायकवाड, विशाल गायकवाड, तुषार डबीर, संभाजी गिरे, दीपक दंडनाईक, रवी चवंडके, संतोष गडाख, महेश सोनवणे, राजेंद्र गायकवाड, राजेंद्र नजन, इकबाल बागवान, रवींद्र गणगले, अमित वाळके, रोहीत हरबा, मनोज गणगले, गिरीश भागानगरे, पवन बोगावत, पराग वाळके, सागर शिंदे आदिंसह प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget