Breaking News

विद्यार्थ्यांनी इंग्रजीवर प्रभुत्व मिळवावे : अरुण आनंदकर


अहमदनगर/प्रतिनिधी : “विद्यार्थ्यांनी इंग्रजी ही ज्ञानाची भाषा आहे व शिक्षणाची जननी आहे. तिच्यावर प्रभुत्व मिळविले पाहिजे. आपण 10 वी व 12 वी झाला म्हणजे एक सूज्ञ व सुशिक्षित नागरिक म्हणून समाज आपल्याकडे पाहतो. 10वी व 12 वी हे जीवनाच्या टप्यावर दिशा देणारे मार्ग आहेत. जीवनात आत्मविश्‍वास महत्वाचा आहे, दुसर्‍याशी तुलना करु नका, टेक्नोलॉजीचा उपयोग चांगल्या कामासाठी करा’’, असे प्रतिपादन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी केले.

केडगांव येथील भाग्योदय माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इ.10 वी व 12 वी च्या विद्यार्थ्यांच्या निरोपसमारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.आनंदकर बोलत होते. कार्यक्रमास मुख्याध्यापक रोहोकले, भाईरेपठार विद्यालयाचे मुख्याध्यापक मधुकर कार्ले, सचिव रघुनाथ लोंढे, प्राचार्य ज्ञानदेव बेरड, रजिस्ट्रार खंडेराव दिघे आदि उपस्थित होते.सूत्रसंचालन संजय गोसावी यांनी केले तर प्रास्तविक बबन कांडेकर यांनी केले. स्वागत व परिचय एकनाथ होले यांनी करुन दिला. आभार दत्तात्रय पांडुळे यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी पोपट येवले, साहेबराव कार्ले, सोपान तोडमल, बाबासाहेब कोतकर, धनंजय बारगळ, गोविंद कदम, आदिनाथ ठुबे, रुपाली शिंदे, बाळासाहेब कावरे, अरुण उरमुडे, गणेश गायकवाड आदिंनी परिश्रम घेतले.