Breaking News

धांदरफळ येथे लाभार्थ्यांना गॅस वितरण


संगमनेर/प्रतिनिधी: काँग्रेसचे आ. बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाने केलेल्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील धांदरफळ बु येथील लाभार्थ्यांना 150 घरगुती गॅस मिळाले आहेत.

धांदरफळ बु येथे प्रधानमंत्री उवला गॅस या योजनेअंतर्गत गॅस वितरण जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव रमेश नेहे, सरपंच भानुदास शेट, माजी सभापती अनिल देशमुख यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी उपसरपंच रामनाथ कवडे, दत्तात्रय कोकणे, अनिल काळे, मारुती कोल्हे, दिनकर देशमुख, सुनिल देशमुख, संतु नायकवाडी आदींच्या उपस्थित गॅस वितरण करण्यात आले.

आ. बाळासाहेब थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयामार्फत इंद्रजित थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले विविध जनसेवकांनी तालुक्यातील विविध गावे ववाडीवस्तीवर जावून गॅस योजनेचा सतत पाठपुरावा करुन गरजूंना लाभ मिळवून दिला आहे. सहकार, शिक्षण, शेती, व्यापार या बरोबर गोरगरिब व दुर्लक्षित घटकांच्या विकासासाठी विशेष योजना राबविल्या. महसूलमंत्रीपदाच्या काळात राबविलेल्या शासन आपल्या दारी योजनेतून अनेकांना विविध योजनांचा लाभ मिळून दिला. सध्या यशोधन कार्यालयाचा जनसेवक हा या गरिबांसाठी महत्वाचा दुवा ठरत आहे. वाडी वस्तीवर सर्व्हे करुन योग्य लाभार्थींना सर्व कागदपत्रे बनवून देत आत्तापर्यंत अनेक लाभार्थ्यांना मिळवून दिले आहेत.

यावेळी रमेश नेहे म्हणाले की, आ. बाळासाहेब थोरात व आ.डॉ.सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा राज्यात अग्रेसर ठरला आहे. यावेळी विठ्ठल डेरे, देवराम काळे, जावेद तांबोळी, दिपक शेळके, नितीन देशमुख, अमोल महाले यांसह धांदरफळ बु गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.