Breaking News

के. जे. सोमैया महाविद्यालयाला 'उत्कृष्ट महाविद्यालय ग्रामीण' पुरस्कार


कोपरगाव / प्रतिनीधी - के. जे. सोमैया महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित 714 महाविद्यालयांमधून उत्कृष्ट महाविद्यालय ग्रामीण हा पुरस्कार प्राप्त झाला. सदर पुरस्कार फलटण येथील निमकर संस्थेचे संचालक डॉ. अनिल राजवंशी, जेष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर आणि कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या शुभहस्ते देण्यात आला. पुरस्कार वितरण पुण्यात पार पडले. रोख रुपये 3 लाख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

हा पुरस्कार प्राप्त होणे ही कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटी व महाविद्यालयाच्या दृष्टीनेच नव्हे तर तालुक्याच्या दृष्टीनेही सन्मानाची बाब आहे अशी भावना संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यादव बी.एस., संस्थेचे सचिव ऍड. संजीव कुलकर्णी, संचालक अशोक खांबेकर, चंद्रशेखर कुलकर्णी, संदीपराव रोहमारे, सदस्य सुजित रोहमारे, कार्यालय अधीक्षक डॉ. अभिजित नाईकवाडे, उपप्राचार्य एस. आर. पगारे,आदी उपस्थित होते. या पुरस्कार वितरणाच्या वेळी सामाजिक कार्यकर्ते गोकुळदासजी शहा, ठमाबाई पवार, सुप्रसिद्ध मराठी लेखक प्रा. द. मा. मिरासदार, ज्येष्ठ शास्त्रज्ञ विजय भटकर, ब्रह्मकुमारी राज योगिनी जानकी दादिजी यांना जीवन साधना पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुलगूरू डॉक्टर नितीन करमळकर यांनी केले तर आभार कुलसचिव डॉ. पवार यांनी केले.