बसस्थानक परिसरात चोरी करणार्‍या महिलेस रंगेहाथ पकडले


राहुरी/प्रतिनिधी
राहुरी बसस्थानकात बसमध्ये पाकीटमारी व चोर्‍या करणार्‍या दोन महिलांना पुणे येथील एका प्रवासी महिलेने रंगेहाथ पकडून राहुरी पोलिसांच्या ताब्यात दिले, तर एक महिला पळून जाण्यात यशस्वी झाली. पकडलेल्या दोन महिलांकडून चोरी गेलेला मुद्देमाल परत मिळविला असून याबाबत पोलिसांत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, दि. 11 फेब्रुवारी रोजी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास सिंदखेडा पुणे बस क्रमांक एम एच 20 बी एल 3025 ही बस पुण्याकडे जाण्यास राहुरी बसस्थानकात थांबली होती. यावेळी निर्मला हनुमंत चव्हाण ही महिला पुणे येथे जाण्यासाठी बसमध्ये चढत असताना तीन महिलांनी तिला घेरले व बसमध्ये चढत असतानाच हाथ कि सफाई दाखवत निर्मला चव्हाण या महिलेची पर्स चोरली. त्या पर्समध्ये सुमारे अडीच ते तीन हजार रूपये रोख व इतर महत्वाची कागदपत्रे होती. पर्स चोरी गेल्याचे निर्मला चव्हाण यांच्या ताबडतोब लक्षात आले असता त्यांनी इतर प्रवाशांच्या मदतीने सदर महिलेला जागेवर पकडून तिच्या पिशवीतून त्यांची पर्स काढून घेतली. सदर प्रकाराने बसमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. यावेळी बस चालकाने बस थेट राहुरी पोलिस ठाण्याच्या गेटसमोर आणून उभी केली.

सदर चोर महिलांनी गयावया करून स्वतःला सोडविण्याचा प्रयत्न केला मात्र निर्मला हनुमंत चव्हाण या धाडसी महिलेने त्यांना राहुरी पोलिसांच्या समोर उभे केले. पोलिसांसमोर सदर महिलांनी सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर त्यांनी त्या पाथर्डी तालुक्यातील असल्याचे सांगितले. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत दुपारी उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. तर या धाडसी महिलेचे अनेकांनी कौतुक केले. बसमध्ये पाकीटमारी व चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या चोर महिलांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. असे मत प्रवाशांनी यावेळी व्यक्त केले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget