Breaking News

बुगेवाडी येथे सामाजिक सभागृह व एल.ई.डी.लाईटचे भुमिपुजन


पारनेर/प्रतिनिधी
बुगेवाडी राम मंदिर सामाजिक सभागृह 12 लाख व बुगेवाडी वाड्या व वस्त्यावरील एल.ई.डी.लाईट सुमारे 18 लाख व सार्वजनिक शौचालय राम मंदिर 1 लाख अशा 34 लाख रुपये किमंतीच्या कामाचे भुमिपुजन वसंत चेडे जि.प.सदस्य अ.नगर यांच्या हस्ते पार पडले.

यावेळी चेडे बोलताना म्हणाले की, पारनेर नगरपंचायतला जेवढा निधी दिला. तेवढा मी मुख्यमंत्री व पालकमंत्री राम शिंदे यांच्या मार्फत आणन्याचा प्रयत्न करेल. कार्येक्रमाच्या अध्यक्ष वर्षा नगरे नगराध्यक्ष नगरपंचायत पारनेर ह्या होत्या. उपनगराध्यक्ष चंद्रकांत चेडे यांनी सहा महीन्यापुर्वी नगरपंचायत मध्ये सतांतर झाल्यानंतर काय विकास केला व करणार आहे. याचा लेखा जोखाच जनतेतेसमोर सांगितला. 15 वर्ष पारनेर ग्रामपंचायत व आडीच वर्ष ज्यांच्या ताब्यात नगरपंचायत होती. त्यांना जनतेला साधे शौचालय देता आले नाही पण आम्ही पारनेर नगरपंचायत मध्ये सत्तातंर झाल्यानंतर जवळपास 715 गरकुल व मागेल त्याला शौचालय दिले. व येत्या एक महीन्याच्या आत बुगेवाडी शाळेची नवीन इमारत चालू होईल. व ज्यांनी 15 वर्षे अश्‍वासन देउनही काम सोबलेवाडी ते बुगेवाडी रस्ता झाला नाही. तो पण लवकर होईल असे सांगितले. पारनेर शहराला राम शिंदे यांच्या प्रयत्नातून मुळाचे पाणी चालू झाले असे त्यांनी सांगितले.

वर्षा नगरे यांनी सांगितले की, पारनेर नगरपंचायतचा सत्ता आमच्याकडे आल्यावर काही लोकांनी भरपुर नगरपंचायतच्या कामात अडथळे आणले पण आम्ही आमचे काम निस्वार्थ चालू ठेवले. यावेळी उपनगराध्यक्ष चंद्रकात चेडे पाणी पुरवठा सभापती विशाल शिंदे, बांदकाम सभापती नंदकुमार औटी, नंदकुमार देशमुख, सुरेखा भालेकर नगरसेविका, शशीकला शेरकर, मालन शिंदे, उद्योजक अर्जनशेट भालेकर हे उपस्थित होते. यावेळी मा.बाबाजी बुगे, सोपान कावरे, दगडु कावरे, ज्ञानदेव कावरे, कावरे, सुभाष शिंन्दे, रामदास वाळुंज, बाळु बोरुडे, विवेक शेरकर, बाळु शेरकर, कारभारी कावरे, बबन बुगे, भगवान कावरे, सुनिल कावरे, मुकुंद शिंन्दे, बाबाजी बुगे, सावकार बुगे, रामदास थोरात उपस्थित होते.