Breaking News

विद्या म्हासुर्णेकर-नारकर प्राईड ऑफ स्पंदन पुरस्काराने सन्मानित


पाटण (प्रतिनिधी) : पत्रकार क्षेत्रात उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल पाटण तालुक्यातील एकमेव महिला पत्रकार आणि पाटण तालुका पत्रकार संघाच्या सचिव विद्या म्हासुर्णेकर-नारकर यांना मान्यवरांच्या उपस्थितीत प्राईड ऑफ स्पंदन पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.

मला मिळालेला पुरस्कार माझ्या एकटीचा नसून माझे पती, मला मिळालेली कुटुंबाची साथ, मित्र, पत्रकार बांधव यांचा असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.

कराड येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी झी मराठी या वाहिनीवरील स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेतील राणूआक्का फेम अश्‍विनी महांगडे, अभिनेत्री व लावणीसम्राज्ञी विजया पालव, गुन्हे अन्वेषण विभाग कराडचे स्वप्नील लोखंडे, उद्योजक सर्जेराव यादव, डॉ. कोमल कुंदप, लिम्का बुक होल्डर डॉ. राजेंद्र कंटक, कोरियोग्राफर मिनल ढापरे, लागीर झालं जी फेम लक्ष्मी विभूते, सेवानिवृत्त माहिती अधिकारी हंबीरराव देशमुख, ऍड. विठ्ठलराव येळवे, सपोनि चंद्रकांत माळी, चंद्रकांत चाळके, प्रा. ए. बी. कणसे, हवालदार गुलाब जाधव, राजाराम डाकवे, गयाबाई डाकवे, ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष संदीप डाकवे, उपाध्यक्ष आप्पासाहेब निवडूंगे, सचिव सौ. रेश्मा डाकवे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. सौ. विद्या म्हासुर्णेकर-नारकर यांना यापूर्वीही उत्कृष्ठ पत्रकारितेत कार्य केल्याबद्दल विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्काराबद्दल त्यांचे आ. शंभूराज देसाई, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर, पाटण तालुका पत्रकारसंघाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, पत्रकार, विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.