Breaking News

ज्यांना दोन अंकी खासदारांच संख्याबळ पार करता आल नाही, ते पंतप्रधानपदाच्या शर्यतीत - मुख्यमंत्री


आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. युती आणि आघाडीसाठी अनेक बैठका व चर्चा सुरु झाल्या आहेत. राजकीय नेत्यांनी मात्र व्यासपीठावरून निवडणुकीची वातावरण निर्मिती सुरु केली आहे. आरोप-प्रत्यारोप, टीका याची सुरुवात तर निवडणुकीच्या प्रचारात होते. पण यंदा सर्व पक्षांनी निवडणुकीच्या घोषणेआधीच प्रचाराला सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि भाजपसह सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे प्रत्येक जण विरोधकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही.


लोकसभेत ज्यांना दोन अंकी खासदारांचा संख्याबळ पार करता आला नाही. असे काही जण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. PM मोदी आणि भाजपविरोधातील महाआघाडीकडे पाहिल्यानंतर पंतप्रधानपदाची खुर्ची आहे की संगीत खुर्ची हेच कळत नाही, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली. तसेच पवारांनी मणिपूरमध्ये सभा घेतली तर पाचपंधरा माणसे जमवणे कठीण होऊन जाईल, असा टोला त्यांनी लगावला.