Breaking News

शिवजयंती निमित्ताने मोफत आरोग्य व रक्तदान शिबीर


राहुरी/ प्रतिनिधी

संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ व शिव प्रतिष्ठाण यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी (१९फेब्रु.) शिवजयंतीच्या निमित्ताने मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली.

संभाजी ब्रिगेड, मराठा महासंघ व शिव प्रतिष्ठाण या सामाजिक हित जोपासणार्‍या सामाजिक संघटनांच्या वतीने शिवजन्म सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये मोफत आरोग्य तपासणी शिबीर, रक्तदान शिबीर, शिव सन्मान पुरस्कार वितरण सोहळा तसेच बालशिव व्याख्याते दादासाहेब बनकर (येवला) यांचे जाहीर व्याख्यान तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मार्केट कमिटीचे सभापती अरूणसाहेब तनपुरे यांच्या हस्ते उदघाटन करून सुरूवात करण्यात येणार आहे. यावेळी राहुरीचे तहसिलदार अनिल दौंडे, पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन शिवाजी गुंड, शिवाजीराव डौले, रमेश बोरूडे, राजेंद्र खोजे, डॉ. प्रकाश पवार, रविंद्र बोरूडे, अतुल तनपुरे, प्रा. वसंतराव झावरे आदींनी केले आहे.