Breaking News

साधना इंग्लिश मिडीयम स्कूलचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहातसातारा, (प्रतिनिधी) : यशोदा शिक्षण संस्था संचालित येथील साधना इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण व स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘लागीर झाले जी’मधील नाना ही व्यक्तीरेखा साकारणारे देंवेद्र देव उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे जनसंपर्क अधिकारी चंद्रकांत सोनावणे, प्रभारी प्राचार्या रजनी नायर, सरपंच संजय शेलार, शामला घोरपडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरूवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन, दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी बोलताना देवेद्र देव म्हणाले, ‘विदयार्थ्यांमध्ये शैक्षणिक विकासाबरोबरच, त्यांच्या अंगी असलेल्या इतर कलागुणांचा विकास होणे गरजेचे असते. त्यासाठी जास्तीत जास्त विदयार्थ्यांनी स्नेहसंमेलनात भाग घेवून आपल्यातील कलाकारला न्याय दयावा.’
प्रा. दशरथ सगरे सरांच्या नेतृत्वाखाली यशोदा शिक्षण संस्थेने अल्पावधीतच मोठी भरारी घेतली असून या ठिकाणी केजीपासून पीजीपर्यंंत विदयार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य अखंड सुरू आहे. यावेळी स्पेार्टस् व इतर परिक्षामध्ये प्राविण्य मिळविलेल्या विदयार्थ्यांंचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी शाळेचा वार्षिक अहवाल जान्हवी वाळवेकर यांनी वाचला. सुत्रसंचालन सोनाली शिंदे यांनी केले. आभार प्रणिता शिंदे यांनी मानले. कार्यक्रमास विदयार्थी, पालक मोठया संस्थेने उपस्थित होते.