दहिवडीत ट्रॅक्टर उलटून युवक ठार



दहिवडी, (प्रतिनिधी) : येथील भटकी मळ्यात निघालेला ट्रॅक्टर उलटला. चालकाचा ताबा सुटल्याने ही दुर्घटना घडली असून त्यामध्ये युवक जागीच ठार झाला. ट्रॅक्टरचालक किरकोळ जखमी झाला असून अपघातानंतर त्याने घटनास्थळावरून पळ काढला. ही घटना बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास घडली.

 संकेत मोहन जाधव (वय 18), असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. ट्रॅक्टरचालक नवनाथ आनंदराव खताळ हा किरकोळ जखमी झाला आहे. संकेत हा नवनाथ खताळ यांच्याबरोबर ट्रॅक्टरमधून भटकी मळा येथे जात होता. कुबेरवस्ती जवळ खराब रस्त्याच्या वळणावर ट्रॅक्टर पलटी झाला. दरम्यान, ट्रॅक्टरमध्ये बसलेला संकेत खाली पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली असून मोहन जाधव यांनी फिर्याद दिली आहे. ट्रॅक्टर चालक याच्या विरुद्ध खराब रस्ता असताना भरधाव वेगाने हयगयीने व अविचाराने ट्रॅक्टर चालवून तो पलटी केल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget