Breaking News

राजेश डांगेना स्वीकृत नगरसेवक करण्याची अ‍ॅड.काळे यांची मागणीश्रीगोंदे/प्रतिनिधी
नगर सभा आंदोलनाचे अध्यक्ष राजेश डांगे यांना श्रीगोंदे नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देण्याची विनंती काँग्रेसकडे निवेदनाद्वारे अ‍ॅड. राम काळे यांनी केली आहे.
राजेश सुभाष डांगे हे स्व.बाळासाहेब विखे यांचे विश्‍वासू सहकारी विखे घराण्याचे जवळचे कार्यकर्त्ये जिल्हा आघाडीचे समन्वयक अ‍ॅड. सुभाष दादा डांगे यांचे चिरंजीव गेली 3 वर्ष नगरसभा आंदोलनाच्या माध्यमातून श्रीगोंदे शहरात समाजसेवक म्हणून सर्वत्र परिचित आहेत. विविध कार्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी डांगे यांनी प्रयत्न केले. त्यांची आई रतन डांगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. व स्वतः राजेश डांगे यांनी प्रभाग क्र.4 ब मधून नगसेवक पदासाठी अर्ज भरला. कॉग्रेसकडे उमेदवारी मागितली. पण नगराध्यक्ष मनोहर पोटे यांना कॉग्रेसने उमेदवारी दिली. तरी देखील राजेश डांगे यांनी आईचा नगराध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज केवळ कॉग्रेस उमेदवार विजयी व्हावे, म्हणुन मागे घेतला. कारण डांगे उभे राहीले असते तर मताचे विभाजन होवून कॉग्रेस उमेदवार पडला असता. या विजयात डांगे यांच्या त्यागाचा मोठा वाटा आहे. 2004 साली देखील मनोहर पोटे केवळ सुभाष डांगेचे भाचे अविनाश धुमाळ यांच्या उमेदवारीमुळे पराभुत झाले होते. हे सर्वसुत आहे. यावेळी डांगे यांना उमेदवारी 4 ब मधून मिळाली नाही. म्हणून भाजपने राजेश डांगे यांना आईचा अर्ज ठेवण्यास सांगितले. व राजेश डांगे यांचा 4 ब मधून मागे घ्यावा. व भाजपला मदत करावी. व बदल्यात राजेश डांगे यांना स्वीकृत नगरसेवक पदाचा शब्द दिला होता. पण राजेश डांगे, सुभाष डांगे यांनी आ.जगताप, सुजयदादा विखे यांचे स्वीय सहाय्यक जानेश्‍वर विखे, मनोहर पोटे, कॉग्रेस जिल्हाअध्यक्ष अण्णा शेलार यांच्या समक्ष तसेच राजु नागवडे यांच्या सांगण्यावरुन नगराध्यपदाचा अर्ज मागे घेतला. तरी आपण डांगे कुंटुंबियांच्या त्यागाचा विचार करून राजेश डांगे या अभ्यासु व्यक्तीला स्वीकूत पदी नियुक्ती करावी व राजेश डांगेना न्यायद्यावा देण्याची मागणी राम काळे आहे.