Breaking News

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात पाहुणे तुपाशी,घरचे उपाशी


प्रशांत हिरे / सुरगाणा
पक्षनिष्ठा ही कागदावरच राहिली आहे, राजकीय सोय महत्त्वाची ठरते आहे त्यामुळे पक्षात येणारे पाहुणे आपल्या ताटातील घास घेण्यासाठी येत आहेत असा विचार मूळ पक्षात असणार्‍यांच्या मनात येऊ लागला आहे राजकीय नेत्यांनीही अन्य निकष बाजूला ठेवून फक्त निवडून येण्याची शक्यता याच मुद्द्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे सर्वच पक्षात अस्वस्थता आहे पाहुणे तुपाशी आणि घरचे उपाशी असे प्रातिनिधीक चित्र सर्वच राजकीय पक्षात आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतील पाहुण्यांची संख्या जास्त आहे इतकाच काय तो फरक आहे दिंडोरीच्या राजकारणात सध्या काय चालले आहे असा प्रश्‍न अनेकांना पडू शकतो कारण याने पक्ष सोडला त्याने पक्ष सोडला या चर्चेलाच सध्या उधाण आले आहे माजी आमदार धनराज महाले यांनी आपला मूळचा पक्ष सोडला आहे आणि नव्या पक्षात प्रवेश केला आहे या राजकीय कोलांटउड्यांचा सर्वाधिक फटका शिवसेनेला बसला आहे आणि सर्वात जास्त गर्दी राष्ट्रवादी मध्ये झाली आहे माजी आमदार धनराज महाले यांच्यामार्फत राष्ट्रवादीमध्ये सुरूच आहे मोठ्या संख्येने त्यांचे समर्थक टप्प्याटप्प्याने दाखल होत आहेत त्यामुळे
राष्ट्रवादीमध्ये वाढणार्‍या गर्दीमुळे पक्षातील निष्ठावान वर्गामध्ये प्रचंड अस्वस्थता दिसू लागली आहे नव्याने येणारे लोंढे म्हणजे आपल्यावर होणारे अतिक्रमण असून त्यामुळे आपल्या हक्कांवर गदा येत असल्याची भावना या वर्गात आहे अशा कितीतरी जागा आहेत जिथे जुन्या कार्यकर्त्यांनी उमेदवारीसाठी दावे केले असताना नव्याने पक्षात आलेल्या कार्यकर्त्यांना तिकीट मिळण्याची दाट शक्यता आहे हेच चित्र थोड्याफार फरकाने राष्ट्रवादीतही आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राजकारणात सुरू झालेला आयाराम-गयारामचा हा खेळ निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरूच राहणार आहे अजूनही कितीतरी नावे अशी आहेत ज्यांचे पक्षांतर निश्‍चित आहे मात्र योग्य टायमिंगच्या प्रतिक्षेत ते आहेत
एकीकडे अशा घडामोडी सुरू असताना भाजप-शिवसेनेच्या युतीच्या बैठका होत आहेत आतापर्यंत चर्चेचे गुर्‍हाळ चालले मात्र ठोस निर्णय झाला नाही भाजप-शिवसेनेत युती व्हावी असा वाटणारा वर्ग कमी आहे आणि ती होऊ नये यासाठी प्रयत्नशील असणारे मोठ्या संख्येने आहेत त्यामुळेच युतीचे भवितव्य सध्यातरी अधांतरीच आहे युती झाल्यास दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना आनंद होण्याची जितकी शक्यता आहे तितकीच शक्यता त्यांच्यात नाराजी होण्याचीही आहे राजकीय नेत्यांनीही अन्य निकष बाजूला ठेवून निवडून येण्याची शकयता याच मुद्द्याला प्राधान्य दिल्याने सर्वच पक्षात अस्वस्थता आहे पाहुणे तुपाशी आणि घरचे उपाशी असे सर्वच राजकीय पक्षातील चित्र आहे राष्ट्रवादीत पाहुण्यांची संख्या जास्त आहे इतकाच काय ते फरक आहे