Breaking News

कोपरगावचे भारूड द्वितीय क्रमांकावर


कोपरगाव / प्रतिनिधी - रंगपीठ थिएटर मुंबई आयोजीत 5 व्या राष्ट्रीय भारुड महोत्सवात कोपरगावच्या भारुडप्रेमींनी सादर केलेल्या भारुडास द्वितीय क्रमांक मिळाला. दरडवाडी ( बीड ) येथे हा महोत्सव संपन्न झाला.

यामध्ये महाराष्ट्रातून 47 संघ सामिल झाले होते. कोपरगाव येथील भारुड कलाकार भानुदास बैरागी, रामेश्वर बैरागी, संदिप जाधव ( मिमिक्री कलाकार ) आण्णा जाधव, गोरख कोटमे, कैलास आगवन,कचरु आहेर ,अशोक शिंदे या कलावंतांनी संत एकनाथी भारुडातून व्यसनमुक्ती हुंडाबंदी, स्त्रीभृण हत्या, स्वच्छता अभियान, झाडे लावा झाडे जगवा इ. राष्ट्रीय विषयावर भारुड सादर केले. सदर भारुडास द्वितीय क्रमांक प्रश्स्तीपत्र सन्मानचिन्ह व रु.दहा हजार मिळाले. प्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक प्रा.वामन केंद्रे ( प्रमूख आयोजक) तसेच गौरी केंद्रे , अशोक केंद्रे यांच्या हस्ते कलावंतांचा सन्मान करण्यात आला. भारुडप्रेमींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.