Breaking News

दहिवडीतील स्वच्छतागृहे झाली हायटेक


दहिवडी (प्रतिनिधी) : स्वच्छ सर्व्हेक्षण योजनेंंतर्गत शहरातील स्वच्छतेबरोबर शौचालयांची सुविधा, सार्वजनिक शौचालयात विजेची सोय, भरपूर पाणी, अपंगासाठी रँम्प रोलिंग, महिलांसाठी सॅनिटरी नॅपकीन सुविधांसह दहिवडी शहर ओडीएफ प्लससाठी सज्ज झाले आहे.

नगराध्यक्षा सौ. साधनाताई गुंडगे, उपनगराध्यक्ष दिलीपराव जाधव, मुख्याधिकारी कपिल जगताप, सर्व नगरसेवक व कर्मचारीवृंद सातत्याने दक्ष राहत आहेत. दहिवडी शहर कचराकुंडीमुक्त करण्याबरोबर सामुदायिक शौचालय, आधुनिक सुविधांनी युक्त आहेत. शाळांमधील स्व्छतागृहे नगरपंचायतीने आधुनिक सोयीयुक्त केलेली आहेत. ज्या नागरिकांना शौचालय बांधण्यासाठी जागा नाही, त्यांसाठी सामुदायिक शौचालय गांधीनगर, भवानवाडी, फलटण रस्ता शहर ओडीएफप्लस होण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहे कायमस्वरूपी स्वच्छ राहण्याबरोबर महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे बांधण्यात आली आहेत.

स्वच्छतागृहातून बाहेर आल्यानंतर नागरिकांच्या प्रतिक्रियांसाठी फीडबॅक घेण्याची देखील व्यवस्था पालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. यामुळे पालिकेच्या या धोरणांबाबत नागरिकांना आपली भूमिका मांडता येणार आहे. स्वच्छतागृहांजवळ दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. वर्षात शौचालय ड्रेनेज गरजेनुसार स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत 396 वैयक्तिक शौचालय असा लाभ देण्यात आला आहे.

न्नागरिकांनी स्वच्छता राखावी, जेणेकरून स्वच्छता राखल्याने आरोग्याचे प्रश्‍न निर्माण होणार नाहीत. उघडयावर शौचविधी करू नये, नागरपंचायतीने जवळपास सर्व लोकांना वैयक्तिक शौचालये दिली आहेत परंतु ज्यांच्याकडे वैयक्तिक शौचालय नाहीत त्यांनी सार्वजनिक शौचालयाचा वापर करावा. शौचालयाची देखभाल ठेवणे आवश्यक आहे.