Breaking News

खासदार खैरे यांनी तोडले अकलेेचे तारेऔरंगाबाद : शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी आरोग्य मेळाव्यात बोलताना अक्षरशः अकलेचे तारे तोडले. ते खासदार आहेत, की चमत्कारी बाबा, असा संभ्रम निर्माण होईल, अशी वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केली आहेत. माझी भस्माची पुडी दिवंगत प्रमोद महाजन यांना लावू दिली असती तर ते जगले असते, असा दावा खैरे यांनी केला. माझ्याकडे डॉक्टरची पदवी नाही; पण मी अनेक लोकांना बरे केलं आहे. माझ्या पुडीने आणि जपाने रुग्ण बरे होतात. त्यामुळे मी रुग्णालयात लोकांना भेटायला जातो, असेही ते म्हणाले. शिवसेनेच्या खासदारांचे हे बोल ऐकून उपस्थित असलेले सर्वच थक्क झाले होते