Breaking News

दहावीच्या परीक्षेसंदर्भात सहविचार सभा


खरवंडी कासार/ प्रतिनिधी: एक मार्चपासून इयत्ता दहावीच्या परीक्षा सुरु होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पार्श्वभूमीवर भगवान विद्यालय खरवंडी येथे पंचक्रोशीतील मालेवाडी, मीडसांगवी, भालगाव, दैत्यनांदुर, मुंगसवाडे, इ माध्यमिक शाळेच्या मुख्यध्यापकांची सहविचार सभा उत्साहात पार पडली. यावेळी अ.नगर जिल्हा मुख्याध्यापक  संघटनेचे अध्यक्ष व संस्थाचालक मिथुन डोंगरे , भगवान विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील अंदुरे,  पर्यवेक्षक वसंतराव खेडकर, केदार , भालेराव, सिरसाट, सर्व सहशिक्षक  व सहशिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष व संस्थाचालक मिथुन डोंगरे यांनी परीसरातील पालकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहीत करावे, त्यांना परीक्षा कालावधीत तणावमुक्त ठेवण्यासाठी त्यांच्या बरोबर अभ्यासाशिवाय गप्पा गोष्टी कराव्यात, जेणेकरुन विद्यार्थी परीक्षेला आंनददायी वातावरणात सामोरे जातील व घवघवीत यश संपादन करतील. या परीसरातील पालकांनी भयमुक्त व काॅपीमुक्त परीक्षा पार पाडण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मिथुन डोंगरे यांनी यावेळी केले .