Breaking News

जनावरांच्या छावण्या सुरू करण्यास प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ


अहमदनगर/प्रतिनिधी : दुष्काळी भागात जनावरांना चारा व पाणी उपलब्ध होण्याच्या अनुषंगाने आवश्यकतेनुसार छावण्या उघडण्यास शासनाने यापूर्वीच मान्यता दिली आहे, त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात चारा छावण्या सुरू करण्यासाठी सक्षम स्वंयसेवी संस्थांकडून विहित मुदतीत प्रस्ताव मागविण्यात आले. जिल्ह्यातून 125 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली असून यापुढील कालावधीत तालुकास्तरीय समितीने प्रस्तावाची छाननी करून छावणी मंजुरीसाठी तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सक्षम स्वंयसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले आहे.

सन 2018 च्या खरीप हंगामात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले सल्याने दुष्काळीसदृश्य परिस्थिती घोषित केली आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीत आवश्यक असणारा चारा व पाणी उपलब्धतेबाबत गंभीर प्रश्‍न नजीकच्या कालावधीत निर्माण होण्याची शक्यता असल्याने दुष्काळग्रस्त भागातील जनावरांना आवश्यक असणार्‍या चार्‍याच्या प्रश्‍नावर मात करण्यासाठी करावयाच्या उपायायोजनाबाबत शासनाने दुष्काळी भागात आवश्यकतेनुसार जनावरांना चारा व पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जनावरांच्या छावण्या उघडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नुसार अहमदनगर जिल्ह्यात छावण्या सुरू करण्याबाबत प्रस्ताव मागविण्यात आले होते. नुसार राहुरी-02, नगर-07, पाथर्डी- 37, पारनेर-03, कर्जत-18, श्रीगोंदा-8 व जामखेड-50 असे एकूण 125 प्रस्ताव प्राप्त झाले आहेत.

प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. चारा छावण्यांची गरज पाहता यापुढील कालावधीतही प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तालुकास्तरीय समितीने प्रस्तावाची छाननी करून छावणी मंजुरीसाठी तहसील कार्यालयामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सक्षम स्वंयसेवी संस्थांनी प्रस्ताव सादर करावेत असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे