Breaking News

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाचे मोफत पूर्व प्रशिक्षण


सातारा (प्रतिनिधी) : भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड (डडइ) या परीक्षेची पूर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपुर्व प्रशिक्षा केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्रातील नवयुवक व नवयुवतीसाठी दि. 21 फेब्रुवारी ते 2 मार्च 2019 या कालावधीत कोर्स क्र.48आयोजित करण्यात येत आहे.

या कोर्ससाठी प्रशिक्षणाची नि: शुल्क सोय करण्यात आली आहे. तरी सातारा जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभेागण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सातारा येथे दि.18 फेब्रुवारी 2019 रोजी मुलाखतीस हजर रहावे. अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड,नाशिक यांचा दूरध्वनीवर क्र. 0253- 2451031 आणि 0253- 2451032 असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा. असे आवाहन रा.रा. जाधव (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.