विशाल गायकवाड यांना पीएचडी पदवी प्रदान


बीड (प्रतिनिधी) -पुणे येथील सिंहगड बिझिनेस स्कुल येथे कार्यरत असलेले सहाय्यक प्राध्यापक विशाल बी.गायकवाड यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनी मार्केटींग मॅनेजमेंट या विषयात संशोधन केले आहे. त्यांनी ‘अ स्टडी ऑफ मार्केटींग इफोर्टस् ऍण्ड बीझनेस परफार्मस ऑफ सिलेक्टेड प्रोसेसस्ड फुड प्रोडक्ट मॅनिफॅक्चरर्स इन पुणे रिजन’ या विषयावर आपला प्रबंध सादर केला.

त्यांनी सदरील संशोधन हे मार्गदर्शिका डॉ. ममता मिश्रा यांच्या मार्गदर्शना खाली पुर्ण केले. यापूर्वी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून एम.एस्सी (इनफॉरमेशन टेक्नॉलॉजी) आणि एमबीए (मार्केटींग ऍण्ड एचआरएम) पूर्ण केले आहे. तसेच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून बी.एड्. सुध्दा पूर्ण केले आहे .त्यांनी व्यवस्थापन या विषयात २०१२ साली नेट परीक्षा पास केली. ते बीड येथील बलभीम महाविद्यालय तसेच चंपावती विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांचे संशोधन हे अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संशोधन परिषद व पत्रिकेत प्रकाशीत झाले आहे. तसेच ते विक्री आणि विपणन या विषयावर प्रशिक्षक म्हणून सुध्दा कार्य करत आहेत. आता पर्यंत त्यांनी बर्याच सहकारी बँक आणि पतसंस्था तसेच अनेक कंपन्यांच्या कर्मचार्यांना विक्री आणि विपणनाचे प्रशिक्षण दिले आहे. ते अनेक सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना २००९ साली आस्मा इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट पुणे यांच्या तर्फे आदर्श शिक्षक पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. त्यांच्या या यशाचे श्रेय त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपल्याला शिक्षणाची प्रेरणा मिळाली आणि त्यांच्या मुळेच मी उच्च शिक्षण घेऊ शकलो असे ते म्हणाले.

Post a Comment

[blogger]

statcounter

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget