Breaking News

भेंडे ग्रामपंचायतच्यावतीने दिव्यगांना खुर्चीचे वाटप

 
भेंडे/प्रतिनिधी :नेवासे तालुक्यातील राष्ट्रपती पारीतोषीक विजेत्या ग्रामपंचायतला शासनाने विशेष प्रकारच्या योजनेतून गावातील दिव्यांग व्यक्ती करीता निधी उपलब्ध करून दिला आहे.त्या निधीतून ग्रामपंचायतने वरील वस्तू वितरण केल्याची माहिती सरपंच गोंडे यांनी दिली.
  
निर्मल ग्राम ग्रामपंचायत भेंडे बु.च्या वतीने दि.25 रोजी ग्रामपंचायत कार्यालयात दिव्यांग कल्याण निधी 5 टक्के सन 2018/19 अंतर्गत खुर्चीचे वाटप सरपंच सखुबाई अंबादास गोंडे यांच्या हस्ते करणेत आले. या वेळी ग्रामपंचायत सदस्य दादा गजरे, देवेंद्र काळे, बाळासाहेब वाघडकर, मंजाबापू गव्हाणे, अशोक काळे, भगवान गालफाडे , रोहिदास आढागळे, रामचंद्र गंगावणे, दत्तू गव्हाणे, ग्रामविकास अधिकारी रेवणनाथ भिसे, ग्रामपंचायत कर्मचारी बाबासाहेब गोर्डे, विष्णू फुलारी, रामकिसन देशमुख तसेच ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थीत होते.