Breaking News

सह्याद्रि कृषी कॉलेजच्या विद्याथ्यार्ंंची आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवासाठी निवड


कराड (प्रतिनिधी) : यशवंतनगर येथील सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठात होणार्‍या महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव 2019 साठी महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीच्या विद्यापीठ संघामध्ये निवड झाली.


सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रज्वल केवळे (व्हॉलिबॉल संघ), स्नेहा कुंभार (कबड्डी संघ) आणि सायली स्वामी (खो- खो संघ) या तीन विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. तसेच सह्याद्रि कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रा. राहूल निकम यांची महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कबड्डी संघाच्या प्रशिक्षकपदी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. शिवाजीराव बच्चे व क्रीडा शिक्षक प्रा. राहुल निकम यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सह्याद्रि सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार बाळासाहेब पाटील, उपाध्यक्षा सौ. लक्ष्मी गायकवाड व सर्व संचालक मंडळ तसेच कार्यकारी संचालक आबासाहेब पाटील, एम. ए. पाटील, व्ही. एम. पोळ आदींनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.